Ad will apear here
Next
प्रमोद वीरचे चित्र सर्वोत्कृष्ट; ‘आदिवासी रत्न’ पुरस्काराने गौरव
ठाणे : शिरोळ (ता. शहापूर, जि. ठाणे) येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत अकरावीत शिकणाऱ्या प्रमोद पंढरी वीर या विद्यार्थ्याची कलाकृती राज्य पातळीवर विजयी ठरली आहे. महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग यांच्या वतीने नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत तो यशस्वी झाला आहे. त्यामुळे त्याला ‘आदिवासी रत्न’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

त्याच्या चित्राची दखल घेऊन नऊ ऑगस्टला नागपूर येथे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आदिवासी विभागा प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्या हस्ते त्याला गौरवण्यात आले. त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक डी. जे. पवार, कलाशिक्षक मारुती कांबळे आणि सर्व शिक्षकवृंदाचे मोलाचे मार्गदर्शन त्याला लाभले. 

या अगोदरही प्रमोदने शालेय स्तरावर वारली चित्रकला स्पर्धेत यश मिळविले असून, शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेत पहिली ग्रेड मिळविली आहे. तालुका स्तरावर बालचित्रकला स्पर्धा, शाळा स्तरावर रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांतही त्याने यश मिळविले आहे. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZTACD
Similar Posts
राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिपमध्ये माधुरी तारमळेला रौप्यपदक शहापूर : तमिळनाडू सिलंबम असोसिएशन व इंडियन सिलंबम फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तमिळनाडूतील इरोड या शहरात टेक्स वॅली चितोड येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिप स्पर्धेत शहापूर तालुक्यातील माधुरी तारमळेने रौप्यपदकाची कमाई केली.
मौजे नांदगाव येथे पशुपालक शेतकरी शिबिर शहापूर : ठाणे जिल्हा परिषद व शहापूर पंचायत समिती यांच्यातर्फे एक दिवसीय तालुकास्तरीय पशुपालक शेतकरी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर किन्हवलीनजीक मौजे नांदगाव (सो) येथे २७ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता होणार असून, ते विनामूल्य आहे.
भिवंडी, शहापूर परिसराचा फेरफटका.. ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण कल्याण-डोंबिवली परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती घेतली. आजच्या भागात माहिती घेऊ या महाराष्ट्राचे मँचेस्टर मानले जाणाऱ्या भिवंडी व शहापूर भागात.
भिवंडीत आदिवासींना विविध योजनांतर्गत आर्थिक मदत भिवंडी : नवीन वर्षाचे औचित्य साधून शहापूर येथील आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी प्रकल्प व जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भिनार जकात नाका येथे सहा जानेवारी २०१९ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आदिवासी लाभार्थ्यांना केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language